व्हॉट्‌सऍपकडून फेसबूकला डाटा दिला जाऊ शकतो ; भारताने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : व्हॉट्‌सऍपच्या प्रस्तावित पेमेंट सेवेचा डाटा समूहातील अन्य कंपन्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हस्तांतरित केला जाऊ शकतो, अशी भीती भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) देण्यात आले आहेत.

व्हॉट्‌सऍपप्रमाणेच गुगल पेसारख्या अन्य खाजगी पेमेंट कंपन्यांचा डाटाही अन्यत्र सामायिक होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना एनपीसीआयला सरकारकडून देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. व्हॉट्‌सऍपची प्रस्तावित पेमेंट सेवा युनिफाइड पेमेंट इंटरफेसवर (यूपीआय) आधारित आहे. यूपीआयद्वारे बॅंक खात्यावरून वास्तवकालीन निधी हस्तांतरण होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॉट्‌सऍपने डाटा सुरक्षेची हमी दिलेली आहे. फेसबुक आणि बिगर-व्हॉट्‌सऍप उपकंपन्या व्हॉट्‌सऍपचा यूपीआय व्यवहार डाटा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी वापरीत नाहीत, असे व्हॉट्‌सऍपने सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.