अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदी सीताराम पा गायकर तर व्हा चेअरमन पदी अशोकराव भांगरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आज चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांचे आध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी जेष्ठ संचालक रामनाथ बापू वाकचाैरे, कैलासराव वाकचाैरे,यमाजी लहामटे, मिनानाथ पांडे,मच्छिंद्र धुमाळ, अशोकराव देशमुख, विक्रम नवले,सुधीर शेळके,विकास शेटे,सचिन दराडे,मनोज देशमुख,पाटिलबा सावंत,प्रदिप हासे,पर्बतराव नाईकवाडी, अशोक आरोटे,बादशहा बोंबले,कैलास शेळके,साै. सुलोचना नवले,साै.शांताबाई वाकचाैरे उपस्थित होते.
सुरूवातीला राज्याचे माजी उपमुख्यमंञी ना.अजित पवार यांच्याशी काल झालेल्या चर्चेनुसार आज मंगळवार दि ४ ॲक्टोबर रोजी सकाळी ना.अजित पवार यानी आ.डॅा.किरण लहामटे यांना फोन करुन दिलेल्या नावानुसार हि निवड ठरली व त्यानंतर सर्व संचालक सभागृहात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांचेकडे चेअरमन पदासाठी जेष्ठ नेते सीताराम गायकर व व्हा चेअरमन पदासाठी अशोकराव भांगरे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमन पदी सीताराम गायकर व व्हा चेअरमन पदी अशोकराव भांगरे यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली .
हि निवड जाहिर झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला .यावेळी आमदार डॅा.किरण लहामटे यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जेष्ठ नेते मधुकरराव नवले ,डॅा.अजित नवले,कॅा.कारभारी उगले,जिल्हा बॅक संचालक अमित भांगरे,आरपीआयचे विजयराव वाकचाैरे, ॲड वसंत मनकर,माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजणे, गुलाबराव शेवाळे,प्रतापराव देशमुख, प्रा.संपत नाईकवाडी, रावसाहेब वाळुंज,राष्ट्रवादी कॅाग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,रामहारी तिकांडे,कॅा.शांताराम वाळुंज,नगरसेवक नवनाथ शेटे,अनिलशेट कोळपकर,भागवत शेटे,संदिप शेणकर,शांताराम धुमाळ,कचरु पा शेटे,कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके,सयाजी पोखरकर सह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.