नवी दिल्ली – रिलायन्स रेटेल व्हेंचर्स ही कंपनी फ्युचर समूहाला 24,713 कोटी रुपयाला खरेदी करण्यास इच्छुक आहे. मात्र या संदर्भात अनेक गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे ठरलेल्या मुदतीत हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. आता रिलायन्स रिटेलने हा व्यवहार करण्यास 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढ जाहीर केली आहे.
याअगोदर ही मुदत 30 सप्टेंबर 2021 रोजी संपत होती. या संदर्भातील माहिती फ्युचर रिटेल कंपनीने शेअर बाजारांना कळविली आहे. या प्रकारनाची सुनावणी आंतरराष्ट्रीय लवादाबरोबरच भारतातील विविध न्यायालयामध्ये चालू आहे. त्यामुळे ठरलेल्या मुदतीत सर्व व्यवहार पूर्ण करणे शक्य होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने फ्युचर समूहाला या संदर्भात सर्वसाधारण सभा घेण्यास मंजुरी दिली आहे.