सीरिया – सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर ठार झाला आहे. ही माहिती अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. अल-कायदाचा कमांडर सलीम अबू अहमद हा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हा हल्ला इदलिब शहरावर करण्यात आला होता. सलीम अल-कायदाला फंडींग करायचा शिवाय, विविध दहशतवादी हल्ल्यांना मंजुरी देण्याचा अधिकारही त्याच्याकडे होता.
अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले, या हवाई हल्ल्यात कुठल्याही सीरियाच्या नागरिकांचे नुकसान किंवा जिवीत हानी झालेली नाही. यापूर्वीही इदलिब शहरात अनेक हल्ले करण्यात आले, ज्यात अल कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
सीरियात होत असलेल्या हल्ल्यांना घाबरुन आयएसआयएसचा प्रमुख अबू अल बकर बगदादी पूर्व सीरियामधून इडलिबला पळून आला आणि अजूनही तो याच शहरात लपला आहे, अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्याने दिली.