सातारा,(प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे शहर संघटक नीलेश मोरे मित्रसमूहातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अन्नदान आणि वळसे येथील एहसास गतिमंद मुलांची शाळा आणि वेळे येथील यशोधन ट्रस्ट येथे फळांचे वाटप करण्यात आले.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेची जिल्ह्यात मोर्चेबांधणी सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नीलेश मोरे मित्रसमूहाच्यावतीने फळवाटप आणि अन्नदान करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, शिवसेना शहर संघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख विक्रम यादव, अजिंक्य राजपूत, अमोल खुडे, यश खत्री, लक्ष्मण गुजर, शिवाजी गांधले, तानाजी गुजर, ओमकार गायकवाड, मनीष मेहता, साईराज इथापे उपस्थित होते.
नीलेश मोरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात विकासकामांच्या माध्यमातून राज्याला वेगळी दिशा दिली आहे. लोकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात आले. यापुढेही असे उपक्रम राबवण्यात येतील.