चंदिगढ : देशभरातील विविध भागांमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली असून काही ठिकाणी तर थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता वाढलेल्या थंडीमुळे हरियाणातील शालेय शिक्षण संचालनालयाने राज्यातील शाळांना दिली जाणारी हिवाळी सुट्टी नियोजित तारखेच्या २ दिवस आधीपासूनच जाहीर केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, या वर्षी वाढलेल्या थंडीमुळे हरियाणा सरकारच्या शालेय शिक्षण संचालनालयाला ३० व ३१ डिसेंबर हे दोन दिवस सुट्टी म्हणून जाहीर करावे लागले असून वार्षिक वेळापत्रकानुसार राज्यातील शाळा १ ते १५ जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टीनिमीत्ताने बंद राहणार आहेत. यंदा वाढलेल्या थंडीमुळे विद्यार्थ्यांना मात्र दोन दिवसांची सुट्टी अधिक मिळणार आहे.
Directorate School Education, Haryana: Due to intense cold wave in the state, Govt has declared holiday on December 30 and 31 in all the schools in the state. All schools will reopen on January 16 after regular winter break from 1st to 15th January.
— ANI (@ANI) December 29, 2019