नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये महिलांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. भारतात असा निर्णय प्रथमच झाला आहे. परंतु जगात अनेक शहरे आणि देशात सार्वजनिक वाहतुकीची मोफत सुविधा देण्यात येत आहे. जर्मनीही काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा विचार करत आहे.
लक्झमबर्गने 2020 पासून सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. बेल्जिअममधील हस्सेल्ट या शहरात 1997 पासूनच सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत आहे. जर्मनीनेही मोफत वाहतूक सेवेसाठी बॉन, एसेन, रॉटलिंग, मॅनहॅम आणि हेरनबर्ग या शहरांची निवड केली आहे.
एस्टोनियाची राजधानी टालिनमध्ये 6 वर्षांपूर्वीच सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली होती. मोफत सेवा सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी प्रशासनाने मतदानही घेतले होते. 75 टक्के लोकांनी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याच्या बाजूने मतदान केले होते.