Jai Shri Ram Tattoo : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
हा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अश्या अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे.
अशातच नागपुरात एका राम भक्ताचा अनोखा उपक्रम पाहायला मिळत आहे. नागपूरातील टॅटू आर्टिस्ट रितीक राजेंद्र दरोडे यांच्याकडून “जय श्री राम’चे निःशुल्क टॅटू रामभक्ताच्या हातावर काढून दिले जात आहे. 2 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत हा टॅटू रामभक्तांना अगदी फ्रीमध्ये हातावर काढून मिळणार आहे.
आतापर्यंत 200 हून अधिक रामभक्तांना टॅटू आर्टिस्ट रितीक राजेंद्र दरोडे यांनी हे ‘जय श्री राम’चे निःशुल्क टॅटू काढून दिले आहे. ससोशल मीडियावर देखील या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.