मांजरी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, आज पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे यांनी शेवाळेवाडी येथे मोफत रॅपिड अँटीजन टेस्ट शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 105 नागरिकांची टेस्ट करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोरे व माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष धनंजय कामठे, प्रदेश उपाध्यक्ष केशव कामठे, तालुका युवा अध्यक्ष सचिन हांडे, सूरज बीरे, विजय कोद्रे, संभाजी हाके, तालुका सरचिटणीस दिनेश भंडारी, विलास आबा शेवाळे, राजेंद्र घुले, मंगेश शेवाळे, सुनील कुंभारकर,प्रतिक खेडेकर सुरेश शेवाळे, अविनाश भंडारी, कैलास जैस्वाल, पांडुरंग शेवाळे उपस्थित होते. यावेळी पुरंदर व हवेली मतदार संघात एक हजार रॅपिड अँटीजन टेस्ट कीट उपलब्ध करून देणार आहे ,असे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितले.