“इंसेप्शन’ मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एलन पेज हिने हॉलीवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या सिनेमांची जेवढी चर्चा झाली नसेल, त्यापेक्षाही अधिक चर्चा तिने आता केलेल्या लिंगपरिवर्तनाच्या ऑपरेशनची होणार आहे. कारण “ती’ एलियट पेज आता चक्क “तो’ झाली आहे.
खरे तर आगोदरही ती स्त्री नव्हती. तर ती ट्रान्सजेंडर होती. मात्र दिसायला अतिशय सुंदर असल्याने सिनेमांमध्ये तिला स्त्री भूमिकांसाठी निवडले जात होते. गेल्या वर्षी एका इंटरव्ह्यूमध्ये तिने ही माहिती सांगितली होती. आता मात्र रितसर ऑपरेशन करून तिने स्वतःला पुरुष करून घेतले आहे.
तिने आता स्वतःचे नाव देखील एलनच्या ऐवजी बदलून एलियट पेज असे केले आहे. आता एलनने स्वतःचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याचे 6 पॅक्ड ऍब्ज दिसायला लागले आहेत.
26 जून 2013 रोजी त्याने टॉप सर्जरी केली होती. त्यानंतर स्वतःचा बदललेला रंग ढंग पाहून तो स्वतःच्याच प्रेमात पडला होता. स्वतःला पुरुष करून घेतल्याबद्दलचा आनंद त्याने ऑपरा विन्फ्रेच्या चॅट शो मध्ये व्यक्त केला.
हॉलिवूडमध्ये चांगले करिअर होत असतानाही वैयक्तिक आयुष्यात असमाधानी असल्याने लिंगपरिवर्तन केल्याचे त्याने सांगितले.