काबूल: अफगाणीस्तानमधील कुनार प्रांतात इस्लामिक स्टेट्सच्या 42 दहशतवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवून शरणागती स्वीकारली. हे दहशतवादी वाटा पूर, चौकी, नुरगल आणि मानोगाय या भागात कार्यरत होते, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
या माजी दहशतवाद्यांनी शांतता प्रक्रियेत सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. सरकारच्या वतीने त्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत. त्यांना सरकारकडून योग्य ती मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले, असे वृत्त जिन्हुवा वृत्तसंस्थेने गव्हर्नर अब्दूल सत्तार मिर्झकवाल यांच्या हवाल्याने दिले आहे.
प्रांतिक पोलिस प्रशासनाकडे त्यांनी 40 मशिनगन्स सोपवल्या आहेत. या माजी विलगतावद्यांनी आत्मसमपर्ण केल्याने या भागात शांतता प्रक्रियेला वेग येणार आहे. काबूलपासून हा भाग सुमारे 180 किमी अंतरावर आहे. या जानेवारीपसून इस्लामिक स्टेटच्या सुमारे 800 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.