माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांचे निधन

नवी दिल्ली – जेष्ठ वकील, माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते मागील २ आठवड्यांपासून आजारी होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा महेश आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत त्यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली. काही काळ सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये बचावपक्षाची बाजू सांभाळली. यात विविध भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या खटल्यांचा समावेश आहे. यामध्ये अभिनेता संजय दत्त, लालू प्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आणखी काही मोठे नेते समाविष्ट आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)