आळंदी – येथील धानोरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय उर्फ निवृत्ती नामदेव रोकडे ( वय ४७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, सून , दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आळंदी येथील सामाजिक कार्यकर्ते दादू रंगनाथ रंधवे यांचे ते मेव्हणे होत. धानोरेत सलग पाच वर्ष सरपंच म्हंणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे कार्य काळात विविध विकासाची कामे झाली.