नेवासा – माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे शुक्रवार (दि.२) रोजी राञी साडे अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले ही घडलेली घटना नेमकी सत्य की असत्य ? अशी शंका माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या राञी झालेल्या निधनामुळे कार्यकर्त्यांना येत होती कार्यकर्ते एकमेकांना भाऊंची निधन वार्ता खरी आहे का ? असे एेकमेकांना राञी कार्यकर्ते विचारत होते.माञ अखेर ही घटना सत्यात उतरल्यामुळे माजी खासदार तुकाराम गडाख पाटील यांच्या निधनाचे वृत्त खरे ठरल्यामुळे नेवासा तालुक्यावर शौककळा पसरली आहे
माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव व कार्यकर्त्यांना संभाळण्याची मोठी ताकद त्यांच्यात असल्यामुळे जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते त्यामुळे राजकारणात तुकाराम गडाख यांचे नांव समोर आले की भल्या – भल्यांची बोलतीच बंद होत होती त्यांना भाऊ या आदरतिथ्य नावाने ओळखले जात होते यांच्या निधनाचे वृत्त आज पहाटे समाजमाध्यमात फिरत होते माञ अखेर राजकारणातील तुफाणी व्यक्तीमत्व असलेले माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झालेली आहे