Murali Vijay – भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोमवारी (३० जानेवारी) ट्विटरद्वारे आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, आता तो परदेशी लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे, हेदेखील सांगायला तो विसरलेला नाही. मुरली विजयने डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कधीही भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही. विजयने भारतासाठी ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत.
मुरली विजयने त्याच्या कारकिर्दीत ६१ कसोटी सामन्यात ३९८२ धावा, १७ एकदिवसीय सामन्यात ३३९ धावा आणि ९ टी-२० सामन्यात १६९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत १२ शतके तर १५ अर्धशतके झळकली आहेत. त्याचबरोबर कसोटी फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच धावसंख्या ही १६७ राहिली आहे. विजयने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये चांगले यश मिळवले. मात्र एकदिवसीय आणि टी-२० मध्ये त्याला कसोटीसारखे यश मिळवता आले नाही.
विश्वकरंडक जिंकल्यानंतर शेफाली म्हणाली, “ही तर नव्या युगाची सुरूवात…”
आपल्या निवृत्तीबाबत माहिती देताना मुरली विजय म्हणाला की, “आज मी कृतज्ञता आणि नम्रतेने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो. २००२-२०१८हा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ राहिला आहे. कारण या काळात खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक माझ्यासाठी मोठा सन्मान होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए), चेन्नई सुपर किंग्ज आणि केमप्लास्ट सनमारयांनी मला दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे.”
144 at Brisbane.
145 at Trent Bridge.
95 at Lord’s.
99 at Adelaide.
97 at Kingsmead.One of the best openers in overseas for India in Tests – Thank you, Murali Vijay. pic.twitter.com/EWbtlXq7ID
— Johns. (@CricCrazyJohns) January 30, 2023
विजयने पुढे म्हटले की, “माझ्या सर्व सहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफसाठी, तुम्हा सर्वांसोबत खेळणे हे माझं नशीबच आहे आणि माझे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात मला मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. ज्या क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाच्या चढ-उतारात मला साथ दिली आहे, त्याचबरोबर मी तुम्हा सर्वांसोबत घालवलेले क्षण नेहमी लक्षात ठेवेल आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.”