नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. लालूंना एअर ऍम्ब्युलन्सने काल पाटण्याहून दिल्लीला आणण्यात आले. मात्र त्यांच्या शरिराची हालचालच थांबल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे काल सांगण्यात आले होते. त्यात आज सुधारणा दिसल्यामुळे लालूंच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
जीन्यावरून पाय घसरल्यामुळे लालूंच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली होती व त्यामुळे त्यांचे शरीर लॉक झाले होते. पण आता सुधारणा झाली असून ऑपरेशनची गरज नसल्यामुळे डॉक्टरांनी म्हटले आहे. लालूंना पुढच्या तीन चार दिवसांत सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट केले जाईल व त्यांना उभे करण्याचा प्रयत्नही केला जाईल असे सांगण्यात आले.
तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती हे सुध्दा सोशल मीडियावरून सतत माहिती देत आहेत.
तेजस्वी यादव यांनी ट्विट (7 जुलै, रात्री 8.34 वा) करून वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे वडील लालू यादव यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. सर्व हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते आणि देशवासियांना विनंती आहे की, कोणत्याही अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका बद्दल काळजी करू नका.
हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और मेरे पिता आदरणीय श्री लालू प्रसाद जी की तबीयत लगातार बेहतरी की ओर है। वो सघन चिकित्सीय निगरानी में है और उनकी हालत में उत्तरोत्तर सुधार है।
सभी शुभचिंतकों, समर्थकों, कार्यकर्ताओं और देशवासियों से आग्रह है किसी भी भ्रामक खबर से चिंतित ना हो। धन्यवाद 🙏
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 7, 2022
तसेच मुलगी मीसा भारती यांनी आज (दि.8, सकाळी 9.21 वा) लालू प्रसाद यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले आहे की, लालू प्रसाद यांच्या प्रकृतीत तुमच्या प्रार्थनेमुळे आणि दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या चांगल्या वैद्यकीय सेवेमुळे खूप सुधारणा होत आहे. आता लालूजी पलंगावरून उठून बसू शकतात. आधार घेत उभेही राहू शकतात. प्रत्येक संकटाशी लढून बाहेर पडण्याची कला लालू प्रसाद यांच्याकडे आहे.
अपने मनोबल और आप सब की दुआओं की बदौलत लालू जी की स्थिति अब काफी बेहतर है। कृपया अफवाहों पर ध्यान ना दें। साथ बनाए रखें, दुआओं में @laluprasadrjd जी को याद रखें।
धन्यवाद।तस्वीरें आज सुबह की: pic.twitter.com/RvcEbqcJRB
— Dr. Misa Bharti (@MisaBharti) July 8, 2022
तुमचे मनोबल आणि तुमच्या सर्व प्रार्थनांमुळे लालूजींची प्रकृती आता बरी आहे. कृपया अफवांवर लक्ष देऊ नका. तुमची साथ अशीच राहू द्या. लालूजी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत रहा. धन्यवाद.