मेलबर्न – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने येत्या काळात क्रिकेटच्या तीन प्रकारांपैकी कोणत्याही एकाच प्रकारात खेळावे, अन्यथा वेळेपूर्वीच त्याची कारकीर्द संपूष्टात येण्याचा धोका आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज जेफ थॉम्पसन यांनी व्यक्त केले आहे.
बुमराहला पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. त्याच्या गोलंदाजीची शैलीच त्यासाठी कारणीभूत आहे. साइड ऑन शैलीने गोलंदाजी करत असलेल्या बहुतेक सर्वच गोलंदाजांना हा त्रास होतो. मात्र, बुमराहची दुखापत अन्य गोलंदाजांपेक्षाही वेगळी आहे. त्यामुळेच त्याचे भारतीय संघातील पुनरागमन लांबले आहे. त्यानेच आपल्या भवितव्याचा विचार करावा. कसोटीतच खेळायचे किंवा एखदिवसीय तसेच टी-20 क्रिकेटमध्येच खेळायचे याचा वितार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले.
अस्त्र म्हणून वापर करा
बुमराहकडे सातत्याने बळी मिळवण्याची क्षमता आहे. बारतीय संघाने त्याचा वापर खुबीने केला पाहीजे. तो बळी घेत आहे म्हल्यावर त्यालाच जास्त षटके गोलंदाजी करायला भाग पाडणे योग्य नाही. त्याचा अस्त्र म्हणून वापर केला गेला पाहीजे तरच तो प्रत्येक स्पेलसाठी ताजातवाना राहील व भारतीय संघालाही त्याचा लाभ होइल, असेही त्यांनी नमुद केले.