मुंबई – अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पोनियिन सेल्वन 2’ या चित्रपटाचा सक्सेस एन्जॉय करत आहे. याशिवाय साऊथ स्टार नागा चैतन्यसोबतच्या अफेअरच्या अफवेमुळेही ती चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत.अशात आता शोभिताने स्वतः याबाबत भाष्य केले आहे.
शोभिता आणि नागा चैतन्य यांना डेट करण्याची अफवा तेव्हा सुरू झाली जेव्हा लंडनमधून दोघांचे एकत्र जेवण करतानाचे काही फोटो व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. गेल्या सहा महिन्यांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते.
‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटाविषयी दिलेल्या एका मुलाखतीत शोभिताने आपल्याबाबत सुरु असलेल्या अफेरवर थेटपणे भाष्य केले. अफेअरबाबतच्या तसेच नागा चैतन्य सोबत डेटिंगच्या सर्व अफवा तिने यावेळी फेटाळून लावल्या आहेत.
नागा चैतन्यला डेट केल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, ‘लोक अर्ध्या ज्ञानाने काय लिहितात याचे उत्तर देण्याऐवजी किंवा स्पष्टीकरण देण्याऐवजी आयुष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते सुधारली पाहिजे. एखाद्याने शांत राहून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं शोभिता यावेळी म्हणाली.
चित्रपटाबाबत बोलताना शोभिता म्हणाली, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला सुंदर चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि मला नृत्य करायला आवडते. मणिरत्नम यांच्या चित्रपटातील एआर रहमान यांच्या तीन गाण्यांवर परफॉर्म करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी सध्या यावर लक्ष केंद्रित करत आहे.
शोभिताच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर शोभिताला ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर ओळख मिळाली. नुकतीच ही अभिनेत्री मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ मध्ये दिसली होती. अभिनेत्री पुढे आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर अभिनीत ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.