लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकांमध्ये मतदारांनी आपल्याच पक्षाला सत्तेच्या चाव्या सोपवाव्यात यासाठी मोठमोठे वायदे करण्यात येत आहेत. अशातच आज राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने व यंदाच्या निवडणुकांमध्ये सत्तेचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या ‘सपा’ने आपापला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजप व सपाच्या जाहीरनाम्यातील काही महत्वपूर्ण व साम्य असलेल्या घोषणा…
महिलांसाठी
भाजप: उज्ज्वला गॅस कनेक्शनधारकांना दरवर्षी होळी-दिवाळीला दोन मोफत सिलिंडर दिले जाणार
सपा: सर्व कुटुंबांना दरवर्षी 2 मोफत सिलिंडर दिले जातील
शेतकऱ्यांसाठी
भाजप : सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देणार. किसान सन्मान निधी दुप्पट केला जाईल.
सपा: सर्व पिके MSP अंतर्गत आणली जातील. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल.
विद्यार्थ्यांसाठी
भाजप : महाविद्यालयीन मुलींना मोफत स्कूटी देणार विद्यार्थ्यांना 2 कोटी टॅब्लेट किंवा स्मार्टफोनचे वाटप केले जाणार आहे
सपा : विद्यार्थ्यांना 2 कोटी किंवा स्मार्टफोन दिले जातील. महाविद्यालयीन मुलींना मोफत स्कूटी दिली जाईल.
गरिबांसाठी
भाजपा: सर्व बांधकाम कामगारांना मोफत विमा. सर्व बांधकाम कामगारांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल
सपा: गरिबांना दरवर्षी 18000 रुपये पेन्शन दिली जाईल.
ज्येष्ठांसाठी
भाजपः ६० वर्षांवरील महिलांना सरकारी वाहतुकीत मोफत प्रवास
सपा : समाजवादी पेन्शन पुन्हा सुरू होईल
कायदा आणि सुव्यवस्था
भाजप : सर्व सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्थांजवळ सीसीटीव्ही बसवले जातील
सपा : 112 वाहने वाढवली जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी 1090 परत आणण्यात येणार आहेत
सपाची दोन खास आश्वासने…
1. यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात समाजवादी कॅन्टीन सुरू करून 10 रुपयांत जेवण दिले जाईल.
2. दुचाकी वाहनधारकांना 1 लिटर आणि चारचाकी वाहनधारकांना 3 लिटर पेट्रोल दिले जाईल.
भाजपची दोन खास आश्वासने…
1. प्रत्येक घरात एका तरुणाला सरकारी किंवा स्वयंरोजगाराची संधी दिली जाईल
2. लव्ह जिहाद करणाऱ्यांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख दंड