Festival Sale 2023: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर अप्रतिम सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये तूम्ही बेस्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊ शकता. किंमतीनुसार स्मार्टफोनची यादी जाणून घ्या..
20,000 रुपयांपर्यंत बेस्ट कॅमेरा मोबाईल –
तुमचे बजेट 20,000 रुपये असेल तर तुम्ही या सेलमधून Samsung Galaxy M34 5G, POCO X5 Pro, Moto Edge 40 Neo आणि Redmi Note 12 Pro हे स्मार्टफोन खरेदी करू शकता. सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 6000 mAh ची मोठी बॅटरी मिळत आहे. हा फोन तुम्हाला 14,499 रुपयांना सेलमध्ये मिळेल. तुम्ही फ्लिपकार्टवरून Moto Edge 40 Neo 19,999 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला Dimensity 7030 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरीसह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा मिळत आहे.
30,000 रुपये बजेटमधील मोबाईल –
तुमचे बजेट 30,000 रुपये असेल तर तुम्ही Pixel 6a, Nothing Phone 1, Realme GT 2 Pro, Samsung Galaxy S21FE, Galaxy A34 5G आणि Vivo V27 ऑर्डर करू शकता. नथिंग फोन 1 मध्ये तुम्हाला दोन 50 मेगापिक्सेल कॅमेरे आणि समोर 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. फोटोग्राफीच्या बाबतीत, हा स्मार्टफोन या किंमतीच्या ब्रॅकेटमध्ये चांगला आहे.
40000 रुपये बजेटमधील मोबाईल –
जर तुमचे बजेट सुमारे 40,000 रुपये असेल तर तुम्ही iPhone 13, Vivo V29 Pro, Pixel 7, Nothing Phone 2, iQOO 9T आणि Xiaomi 12 Pro खरेदी करू शकता. iPhone 13 मध्ये 12+12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तुम्ही ते 39,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकता. तसे, त्याची किंमत 45,999 रुपये आहे.
50000 रुपये बजेटमधील मोबाईल –
जर बजेट सुमारे 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही फेस्टिव्हल सेलमधून Xiaomi 13 Pro, iQOO 11, Vivo X90/ Pro, OnePlus 11, iPhone 13/14 आणि Galaxy S23 Ultra इत्यादी स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्ही Samsung Galaxy S23 Ultra 5G Rs 1,16,999 मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 200MP चा प्राइमरी कॅमेरा मिळेल.