Pune News – देशभरात ७७ वा स्वातंत्र्यदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळे व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र पाहायला मिळाली. अशातच पुण्यातील रुद्रांग वाद्य पथकातर्फे ध्वजारोहणाचा मान तृतीयपंथी व्यक्तींना देत सामाजिक भान जपण्यात आलं आहे.
यावेळी, डॉ. दिपा नंदगीरी व त्यांच्या सहकारी तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे रुद्रांग वाद्य पथकातर्फे सांगण्यात आले.
डॉ. दिपा नंदगीरी तृतीयपंथी समाजातील डॉक्टरेट
डॉ. दिपा नंदगीरी यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ध्वजारोहणाचा मान मिळाल्याबाबत डॉ. दिपा नंदगीरी यांनी समाधान व्यक्त करत रुद्रांग वाद्य पथकाचे आभार मानले.