वृत्तसंस्था – हरियाणाच्या अंबाला-दिल्ली महामार्गावरील हिलिंग टच हॉस्पिटलजवळ सोमवारी सकाळी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे तीनच्या सुमारास कटराहून दिल्लीला जाणाऱ्या तीन पर्यटक बसेसची धडक झाली असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत.
Five people were killed and eight were injured in a bus accident that took place near Healing Touch Hospital on Haryana's Ambala-Delhi highway in the early hours today. The bus was going towards Delhi when another bus hit it from behind. We have registered a case: ASI Naresh pic.twitter.com/D8231y2P12
— ANI (@ANI) December 27, 2021
मीना देवी (वय ४४ रा. छत्तीसगड), राहुल (वय २१ रा. झारखंड), रोहित (वय ५३ रा. छत्तीसगड), प्रदीप (वय २२ रा. कुशीनगर उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मृतांपैकी एकाची ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीलंनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. जखमींना हिलिंग टच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.