मुंबई – अभिनेत्री आणि राजकारणी ‘नुसरत जहॉं’ ही खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने मुलाला जन्म दिला. ‘यीशान’ असे मुलाचे नाव असून मुलाच्या जन्मावरून आणि मुलाचे वडील कोण? या प्रश्नांवरून नुसरतला सतत ट्रोल करण्यात येत आहे.
View this post on Instagram
नुकतंच कोलकत्ता येथे पार पडलेल्या एका कार्यक्रम दरम्यान, नुसरतला पुन्हा एकदा असेच काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांवर नुसरत सुद्धा चंगली भडकली असून, ती म्हणाली.. ‘माझ्या मते हा प्रश्न विचारणे व्यर्थ आहे. एखाद्या महिलेला तिच्या बाळाचे वडील कोण आहेत, हे विचारणं म्हणजे तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं आहे.
View this post on Instagram
माझ्या बाळाच्या वडिलांना माहित आहे की, ते या बाळाचे वडील आहेत. तसेच आम्ही दोघं सोबत बाळाचे अतिशय चांगले संगोपण करत आहोत. सध्या यश दासगुप्ता आणि मी चांगला वेळ घालवत आहोत.’ असं नुसरत म्हणाली.
View this post on Instagram
यश दास गुप्तासोबत रिलेशनशिप…
नुसरत जहाँ गेल्या वर्षभरापासून अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने निखिल जैन सोबत लग्न झाल्याचे नाकारले आहे. अनेक महिन्यांपासून ती निखिल जैन याच्यापासून वेगळी राहत होती.
View this post on Instagram
नुसरत सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दासगुप्तासोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. फॅन्स सुद्धा त्यांच्या या फोटोंवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.