ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांना यश; कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती अंतर्गत मंजुरी
कोयनानगर – पाटण विधानसभा मतदारसंघातील भूकंप प्रवण क्षेत्रातील विविध गावांतील सभामंडप, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, शाळा खोल्या बांधणे आदी. विविध विकासकामांसाठी 5 कोटी 47 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्यातीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील 31 गावांतील सभामंडप, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, शाळा खोल्या बांधणे आदी. विकासकामांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर ह्ण्यासाठी दि. 16 मार्च 2023 रोजीच्या पत्रानुसार मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 31 गावांतील विविध विकासकामांना 5 कोटी 47 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये अंतर्गत रस्ता सुधारणा कामांसाठी काळगाव 14.99 लाख, घोटील 15 लाख, दुधडेवाडी-काळगाव पोहोच रस्ता सुधारणा 14.99 लाख, शिबेवाडी वरची-गुढे 15 लाख, मारुल तर्फ पाटण – गमेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, रासाटी नवलाई मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख, मसुगडेवाडी-केळोली 10 लाख, जाळगेवाडी 15 लाख, माजगाव धुमाळवस्ती व भोसलेवस्ती 20 लाख, मंद्रुळकोळे-जौंजाळवाडी 19.92 लाख, मत्रेवाडी 14.99 लाख, अनुतेवाडी जिंती-भैरवनाथ 14.95 लाख, माईंगडेवाडी जिंती ते डिसले आवाड 19.99 लाख, रुवले 24.91 लाख, साबळेवाडी 14.98 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच ना. बाळासाहेब देसाई हायस्कूल कुसरुंड वर्ग खोल्यांचे बांधकाम 19.96 लाख, आंब्रुळे येथे विठ्ठलाई मंदिरास सभामंडप 12 लाख, दौलतनगर संरक्षक भिंत व बंदिस्त आर.सी.सी.गटरसह रस्ता सुधारणा 39.98 लाख, दुधडेवाडी-मरळी 15 लाख, कै. सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे शाळा खोल्या दुरुस्ती 19.96 लाख, गणेवाडी-ठोमसे 15 लाख, ठोमसे समाज मंदिर 12 लाख, जमदाडवाडी सामाजिक सभागृह 11.99 लाख, बोडकेवाडी सभामंडप 12 लाख, पापर्डे 14.97 लाख, मल्हारपेठ शिवाजी चौक परिसर सुशोभिकरण 15 लाख, म्हावशी आर.सी.सी.गटर 15 लाख, मेंढोशी (खालची) जोडरस्ता 15 लाख, बोंद्री-वनवासवाडी 15 लक्ष या कामांचा समावेश आहे.
दरम्यान, मंजूर विकासकामांची अंदाजपत्रक, निविदा कार्यवाही करण्याच्या सूचना ना. देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने ना. देसाई यांचे प्रयत्नातून या 31 गावांतील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांकडून ना. देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.