बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी, सर्वात मोठ्या पावसाची नोंद

बीड – दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. जूनमध्ये पावसाने हजेरी रावल्यानंतर पाऊस गायबच झाला होता. मात्र, परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात चांगलीच मुसळधार हजेरी लावली आहे. सोमवारी सायंकाळी झालेला जोरदार पाऊस हा बीड जिल्ह्यासाठी या मोसमातील सर्वात मोठा पाऊस ठरला आहे. या जोरदार पावसामुळे काही तासांमध्येच शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.

दरम्यान, सोमवारी परभणी, हिंगोलसह बीड जिल्ह्यात परतीचा दमदार पाऊस झाला. सायंकाळी बीड शहरात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने काही तासांतच शहरातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. शहरातील काही भागात चक्क कमरेइतके पाणी साचले होते.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात तीन फुटांपर्यंत पाणी तुंबले होते. दरम्यान, संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच बिंदूसरा नदी वाहू लागली आहे. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे शहरातील दगडी पूलापर्यंत पाणी आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.