पाकिस्तानकडून कठुआ जिल्ह्यात गोळीबार

जम्मू – पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेनजिक असलेल्या भारतीय खेड्यावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. करोल मत्राई, आणि चांडवा या परिसरात त्यांनी हा गोळीबार केला. मध्यरात्री पाऊण वाजता त्यांनी हा गोळीबार सुरू केल्यानंतर भारतीय बाजूकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

मध्यरात्री तीन वाजेपर्यंत तेथे दोन्ही बाजूंकडून हा गोळीबार सुरू होता. तथापि त्यात भारतीय बाजूकडील कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या चकमकीमुळे सीमेनजिकच्या भारतीय खेड्यांमधील रहिवाशांमध्ये मोठीच घबराट पसरली होती. गावकऱ्यांनी सुरक्षेसाठी तेथे बांधण्यात आलेल्या बंकर्स मध्ये आश्रय घेतला.

मधे काही काळ उसंत घेतल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा त्या भागात ही आगळीक करण्यात आली असली तरी त्यांना तेथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.