खंडाळा (प्रतिनिधी)- शिरवळ येथील ब्राऊन पेपर मिललारात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते.
घटनास्थळी शिरवळ पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीम व एशियन पेंट्सचे अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
काही दिवसांपूर्वीच शिर्के कंपनीतील भंगार मालाला अज्ञातांनी आग लावली होती. यामुळे आजची आगही जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे
ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी शिर्केमिलला दहा वाजता आग लागली आहे. 2012 पासून ही कंपनी बंद आहे. कंपनी कामगारांमध्ये वाद आहे. या सर्व बाबी न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला सील आहे. त्यामुळे मिलच्या आतील भागातील आग विझविण्यासाठी जाता येत नसल्याची माहिती मिळत आहे.