नेवासा – लोणी (ता. राहता) येथील बस स्थानकावरून इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचे अपहरण झाले आहे. ही घटना सोमवार (दि. 18 सप्टेंबर) रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीचे वडीलांनी लोणी (राहता) पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र चार दिवसानंतरही मुलीचा तपास लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. (kidnapping)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 17 वर्षीय विद्यार्थीनी नेवासा येथील विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकते. ती महाविद्यालयातील इतर मुलींसोबत एनसीसी कॅंम्पसाठी (दि. 9 सप्टेंबर) रोजी गेली होती. 18 तारखेला घरी परतणार होती. त्या दिवशी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान विद्यार्थी लोणी बस स्थानकावर पोहोचले. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने विद्यार्थीनीच्या हाताला धरून एका गाडीत बसवून फरार झाले.
याबाबत सोबतच्या विद्यार्थीनींनी घडलेल्या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. त्यांनी याबाबत विद्यार्थीनीचे वडीलांना माहिती दिली. तात्काळ पोलीस ठाणे गाठत मुलीचे वडिलांनी तक्रार नोंदवली. मात्र चार दिवस झाले तरीदेखील अद्याप मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. याबाबत मुलीच्या नातेवाईकांना घातपात झाल्याची भीती आहे. तर दुसरीकडे पोलिसांना मुलीचा शोध घेण्यात अद्याप यश न मिळाल्याने तपासाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.