देहूरोड – राजकीय पक्ष व व्यापारी वर्गांमध्ये तेढ निर्माण होऊन शत्रूत्व निर्माण होण्यासाठी अश्लील भाषण केल्याप्रकरणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमीन शेख यावर देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीन मेहबूब शेख (रा. देहूरोड, मेन बाजार पेठ) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू (वय 51, रा. मरीमातारोड, गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.
आरोपी अमीन यांनी देहूरोड मेंन बाजारपेठेतील महात्मा फुले भाजी मंडई येथे दोन आठवड्यांपूर्वी रविवारी (दि. 27 डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना बोलावून त्यांच्या समक्ष राजकीय पक्ष व व्यापारी वर्गांमध्ये तेढ निर्माण होऊन त्यांच्यामध्ये शत्रुत्व वाढीस लागेल अशा प्रकारचे चिथावणीखोर आणि अश्लील भाषण केले. तसेच व्यापारी वर्गाला धमकावत, शिवीगाळ करून सामाजिक एकोपा टिकण्यास बाधक होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्हायरल झालेला व्हिडिओसह शेख याची तक्रार पोलीस आयुक्तालय कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने दखल घेत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.