पुणे (प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे बाळगणाऱ्यास अटक केली आहे. त्याच्या विरुध्द पुर्वी दुखापतीचा एक व आर्म ऍक्टचे दोन असे तीन गुन्हे ( Crime ) दाखल आहेत. रमेश नरसिंग राठोड(30,रा.वडारवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पेट्रोलिंग करताना गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी अप्पर इंदिरानगर परिसरात राठोड हा पिस्तूल घेऊन येणार असल्याची खबर पोलीस अंमलदार अमोल पवार याला मिळाली. त्यानूसार सापळा रचून पीएमपीएल आवारातील कोठीसमोरुन त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत पिशवीमध्ये दोन गावठी पिस्तूल व काडतूसे सापडली. याची किंमत 1 लाख 22 हजार इतकी आहे. त्याच्याविरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत ही शस्त्रे रोहित उर्फ गोपाळ गवळी (रा.दांडेकर पुल) याने ठेवण्यासाठी दिली असल्याचे सांगितले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, सतील भालेकर यांच्या पथकाने केली.