10 किलो कांद्याला प्रतवारीनुसार 70 ते 80 रुपये बाजारभाव
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील बाजार समितीच्या उपबाजार आवारात कांदा लिलाव प्रसंगी शनिवारी (दि. 1) 1 हजार 500 कांदा पिशव्यांची आवक झाली. 10 किलो कांद्याला प्रतवारीनुसार 70 ते 80 रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
लोणी येथील बाजार समितीच्या आवारामध्ये शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या हद्दीवरून कांद्याची आवक होते. कांदा लिलाव प्रसंगी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्यासह संचालक, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. 1 हजार 500 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार 10 किलोला सुमारे 70 ते 80 रुपये बाजारभाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दहा ते बारा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पिशव्यांऐवजी मोकळा कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणला होता.अशी माहिती लोणी उपबाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख गणेश गावडे यांनी दिली. सोमवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत खुला (मोकळा) व पिशवीतील कांद्याचे लिलाव घेण्यात येतील. शेतकऱ्यांना कांद्याची रोख पट्टी पेड करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कांदा आणताना फाळी (कागद) सोबत घेऊन यावे. कांदा आणताना चांगला, मध्यम, भुगी, बदला असा प्रतवारी करून आणावा, असे आवाहन सभापती देवदत्त निकम यांनी केले.