FIFA 2026 World Cup Qualifiers, India vs Qatar : भुवनेश्वर – कतारकडून पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागल्याने फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ पात्र ठरणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वकरंडकाप्रमाणेच फुटबॉल विश्वकरंडकही भारतासाठी अद्याप दूरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
फुटबॉल विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत कुवेतचा पराभव केल्यावर कतारविरुद्ध विजय मिळला तर पात्रता फेरीत स्थान मिळेल असा विश्वास भारतीय फुटबॉल संघटनेला होता मात्र, कतारकडून 3-0 असा पराभव झाल्याने भारतीय संघ पात्रता फेरीतूनही बाहेर पडला आहे. पात्रता फेरीतील पहिल्या क्रमांकाच्या दोन संघाना एका गटातून मुख्य पात्रता फेरीत स्थान मिळते. ते स्वप्नही भारताच्या बाबतीत भंग झाले आहे.
A brave fight from the #BlueTigers in Bhubaneswar wasn’t enough to get a result against the Asian champions.#INDQAT ⚔️ #FIFAWorldCup 🏆 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/EE3uOVNlKc
— Indian Football Team (@IndianFootball) November 21, 2023
सामन्यात कतारच्या मुस्तफा मशालने चौथ्या मिनिटाला आपल्या संघाचा आणि सामन्याचा पहिला गोल केला. दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी म्हणजेच 47व्या मिनिटाला अल्मोज अलीने कतारसाठी दुसरा गोल केला. सामना संपण्याच्या काही वेळापूर्वी कतारने तिसरा गोल केला. युसूफने 86व्या मिनिटाला कतारसाठी तिसरा गोल केला.
दरम्यान, भारतीय संघाने कुवेतसोबत फिफा विश्वचषकाचा पहिला क्वालिफायर सामना खेळला होता, ज्यामध्ये टीम इंडियानं (ब्लू टायगर्स) 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात मनवीरने टीम इंडियासाठी एक गोल केला होता.