फर्ग्युसनची प्रिया बनली “मिसेस इंडिया वॉशिंग्टन’

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची माजी विद्यार्थिनी असलेली प्रिया मधुकर सूर्यवंशी हिने मिसेस इंडिया वॉशिंग्टन यूएसए-2019 हा सन्मान मिळवला आहे. प्रिया ही मूळची आष्टी तालुक्‍यातील डॉ. मधुकर हंबर्डे ह्यांची कन्या असून तिने पुण्याच्या प्रतिष्ठेच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पर्यावरणशास्त्रात पदवी घेतली आहे. काही वर्ष पुण्यातल्याच बायफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तिने कामही केले.

महाविद्यालयीन जीवनापासूनच तिला अभिनय आणि कला क्षेत्रात आवड निर्माण झाली. पुढे वर्ष 2016 मध्ये तिचा विवाह अमेरिकेत ऍमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सुदर्शन धुमाळ सोबत झाला आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली.

मात्र, तिने तिची आवड जोपासणं कधी सोडलं नाही. तिथेही ती अभिनय व मॉडेलिंग करत आहे. रॅव्हिशिंग विमेन्स ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिसेस इंडिया वॉशिंग्टन-यूएसए 2019’ स्पर्धेत तिने भाग घेतला आणि त्यात ती प्रथम विजेती ठरली.

दोन दिवसांची ही स्पर्धा सिऍटल शहरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे विस्तारित स्वरूप इंटरव्ह्यु, टॅलेंट राऊंड, एथनिक राऊंड, इंट्रोडक्‍शन, इव्हिनिंग गाऊन राऊंड व प्रश्‍न-उत्तर राऊंड असे होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.