ट्युनिस – भरसंसदेत महिला खासदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्युनिशियाच्या संसदेतील मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.
हा व्हिडिओ संसदेत सुरू असलेल्या चर्चे दरम्यानचा असून चर्चा सुरू असताना अचानक खासदार आपल्या जागेवरुन उठला आणि एका महिला खासदाराच्या त्याने कानशिलात लगावली. साहबी समरा असे मारहाण करणाऱ्या खासदाराचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने महिलेला कानशिलात लगावल्यानंतर इतर खासदारांनी साहबी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा राग अनावर झाला आणि त्याने खासदार महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
महिला खासदार अबीर माउसी या संसदेत ट्यूनिशिया सरकार आणि कतर फंड फॉर डेवलपमेंट यांच्यात सुरू असलेल्या करारावर विरोध करत होती. त्याचवेळी चिडलेले खासदार साहबी समरा यांनी या महिलेच्या कानशिलात लगावली.