Malegaon Firing News| मालेगावमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. अब्दुल मलिक यांना तीन गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने मालेगावच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र मालेगावमधील उपचारानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले आहे.
माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा हे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घटली. घटनेची माहिती मिळताच मलिक यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. Malegaon Firing News|
दरम्यान हात, पाय आणि छातीत गोळी लागल्यामुळे मलिक यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गोळीबारचा निषेध करून हल्लेखोरांचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अब्दुल मलिक माजी महापौर असून सध्या ते एमआयएमचे नगरसेवक आणि मालेगाव महानगर प्रमुख आहेत. Malegaon Firing News|
हेही वाचा:
पुण्यातील अपघाताप्रकरणी ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप