पिंपरी – उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शहरात सध्या आंदोलनाची संख्या वाढली आहे. अशी आंदोलने करताना संबंधित कार्यकर्ते योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत.
काहीजण अद्यापही बेफिकीरपणे वागताना दिसत आहेत. यापैकी अनेक कार्यकर्ते मास्क लावताना दिसत नाहीत. सध्या करोनाबाधितांच्या संख्येत घट आलेली आहे.
मात्र वाढत्या आंदोलनांमुळे करोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.