करण जोहरने अलीकडेच ई-व्यासपीठावर “घोस्ट सीरिज’ नावाचा एक हॉररपट लॉंच केला. या चित्रपटाची बरीच चर्चाही झाली. पण आता स्वतः करण जोहरच यामुळे घाबरला आहे. करण म्हणतो, यापुढील काळात एकाही भयपटाचे दिग्दर्शन करणार नाही.
View this post on Instagram
#yourfearswillfindyou #ghoststories @netflix_in @rsvpmovies @ashidua @zoieakhtar @tigerbabyfilms
मुळात, हॉरर चित्रपट हे माझ्या धाटणीचेच नाहीत. घोस्ट सीरिज हा माझा आयुष्यातील पहिला आणि शेवटचा भयपट होता. भविष्यात अशा जॉनरचा एकही चित्रपट मी बनवणार नाही. मुळात मी हॉरर चित्रपट कधीही पाहातही नाही. असे असताना अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याचा मी विचारच का करू, असे करण म्हणतो.
घोस्ट सीरिजबाबत आपला अनुभव सांगताना करण म्हणतो की, कोणत्याही दिग्दर्शकाला कथानकासोबत एकरूप होऊन काम करावे लागते. तरच चित्रपटाची बांधणी-मांडणी आणि सादरीकरण सुयोग्य प्रकारे होते. दिग्दर्शकाला स्वतःलाच जर चित्रपट समजून घेता आला नाही, फील करता आला नाही तर तो प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणाने मांडू शकत नाही.
घोस्ट सीरिजसारख्या चित्रपटांची कथानके मला अनकम्फर्ट वाटतात. त्यामुळे मी माझ्यातील सर्वोत्तम कौशल्य त्यासाठी देऊ शकत नाही. म्हणूनच गेल्या 21 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत मी भयपटांचा मार्ग स्वीकारला नाही. घोस्ट सीरिजचा अनुभव माझ्यासाठी भीतीदायक आणि आव्हानात्मक होता. तेव्हा यापुढे त्या मार्गाने जाणे नाही, असे करण सांगतो.