बापाचं काळीज ! लेकराला वाचविण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मुलाची केली सुटका

मुंबई – मागील काही वर्षांत मानवी वस्तीत शिरून नागरिकांवर बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलं. विदर्भात याचं प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी बिबट्याकडून लहान मुलांना लक्ष्य करण्यात येत. मुंबईतही अशीच घटना घडली. मात्र एका पित्याने जीव धोक्यात घालून बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या आपल्या लेकराला वाचवलं.

मुंबईतील आरे कॉलनीत मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत आहे. त्यातच बिबट्याने येथील 8 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. या मुलाचं नाव रोहित आहे. रोहित दुकाणातून घरी जात होता. त्याचवेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. तसेच त्याला आपल्या जबड्यात पकडलं. त्यामुळे घाबरलेल्या रोहितने आऱडाओरड केली.

रोहितचा आवाज ऐकूण त्याचे वडिल त्याला पाहण्यास धावले. त्यावेळी त्यांनी टॉर्च बिबट्याच्या तोडांवर रोखली. टॉर्चच्या प्रकाशामुळे बिबट्याने घाबरून रोहितला सोडलं आणि तिथून पळ काढला.

या घटनेत रोहितच्या पायाला दुखापत झाली. बिबट्याने त्याचा पाय आपल्या जबड्यात धरला होता. रोहितच्या वडिलांनी दाखवलेल्या हिंमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.