नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. याची अंलबजावणी उद्या 15 फेब्रुरीपासून करण्यात येणार आहे. फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. याआधी 1 जानेवारी फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून 15 फेब्रुवारी केली होती.
फास्टटॅग हा एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, आयसीसीआय बॅंक, कोटक बॅंक, आयडीएफसी बॅंक सारख्या बॅंकाद्वारे मिळू शकते. सर्व महामार्ग फास्टटॅग पेमेंटयुक्त करण्यासाठी आपण बांधील असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. 15 आणि 16 च्या मध्यरात्रीपासून सर्व सशुल्क लेन आता फास्टटॅग लेन म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानानेच पैसे स्वीकारण्यात येणार आहेत.नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टॅग जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ वाचेल. त्यामुळे पैसे भरण्यासाठी रांगेत थांबावे लागणार नाही.
फास्ट टॅग एक स्टिकर आहे जे तुमच्या गाडीच्या विंडस्क्रिनवर लावले जाते. हे स्टीकर कारच्या विंडशिल्डच्या आत लावले जाते. यात बारकोड असतो. डिवाईस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीचा वापर यात केला जातो. जी टोल प्लाझावरील स्कॅनरला कनेक्ट असते. गाडी पास झाल्यानंतर तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमधील पैसे कट होतात. फास्ट टॅगला तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला जोडू शकता. ज्या ज्या ठिकाणी टोल लागेल तेव्हा तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतील.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी 40 हजार विक्री केंद्रे उभारली आहेत. तो खरेदी असण्यासाठी तुमच्या खात्यात किमान शिलकीची कोणतीही अट नाही. हा फास्ट टॅग पाच वर्षांसाठी लागू असेल. तो पेटीएम, फोन पे, युपीआय, किंवा डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्डने रिचार्ज करू शकता.
जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.