ग्रामीण भागात शेती व्यवसायासाठी व शेतीमाल वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना वाहनांची गरज आहे.
अशा वाहनांची उपलब्धता काटे फोर्स आणि जय ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून विद्याधर श्रीकांत काटे आणि वैभव श्रीकांत काटे यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी केंद्रबिंदू मानून पूर्ण केलेले आहे.
वाटचाल ग्राहकांच्या विश्वासावरच…
काटे मोटर्स नावाने टाटा कमर्शियल डीलरशिप सुरू करण्यात आल्यानंतर ग्राहक केंद्रबिंदू मानून व “ग्राहकांची सेवा हीच ईश्वरसेवा’ असल्याप्रमाणे ग्राहकांना अत्यल्प व्याजदरांमध्ये कंपनीचे फायनान्स उपलब्ध करून दिले आहे.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी योजना राबवल्या आहेत. ग्राहकांनी व शेतकऱ्यांनीदेखील काटे मोटर्स आणि जय ट्रॅक्टर्स शोरूमवर कायम विश्वास ठेवला असल्याने व आम्हीदेखील सर्व ग्राहकांची विश्वासाहर्ता संपादन केल्याने ग्राहकांनी या दोन्ही शोरूमला पसंती दिलेली आहे.
त्यामुळे इथून पुढेही आमच्यावर अशाच प्रकारे विश्वास ठेवून आम्हाला ग्राहकांची सेवा करण्याची संधी द्यावी. आम्ही कायम ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत.