पुणे – आयकर भरत असतानादेखील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील 16 हजार 110 शेतकऱ्यांना नोटीस देण्याचे काम तहसीलदार यांच्याकडून सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातून एकूण सुमारे 14 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करून पुन्हा केंद्र शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
आयकर भरत असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या बारामती तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील 2 हजार 394 शेतकऱ्यांना नोटीस बजवाण्यात येणार आहेत.
त्याखालोखाल जुन्नर-2,140 तर शिरुरमध्ये 1,925 शेतकऱ्यांना संबधित रक्कम भरण्याच्या नोटीस दिल्या जाणार आहेत.
तालुकानिहाय लाभ घेतलेले सधन शेतकरी
आंबेगाव तालुक्यातील 1हजार 171, भोरमधील 633, दौंड मधील 1 हजार 673, हवेली तालुक्यातील 692, इंदापूरमधील -1हजार 37, खेड मधील 1 हजार 473, मावळ-538, मुळशी-830, पुरंदर-1 हजार 332 आणि वेल्हा तालुक्यातील 272 नोटीस बजावून त्यांच्याकडून धनादेशाद्वारे ही रक्कम जमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.