मुंबई – मालिका,वेबसिरीज सिनेमा अशा विविध कलाकृतींद्वारे आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने सर्वच फॉरमॅटमध्ये आपल्याला सिद्ध केलं आहे. म्हणूनच तेजस्विनीचा चाहता वर्ग मोठा आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टिव्ह असते. शूटिंग असो वा व्हेकेशन ती आपल्या प्रत्येक गोष्टींची अपडेट चाहत्यांना देत असते. नुकतंच तेजस्विनीने स्विमिंग पुलमधील आपला एक फोटो पोस्ट केला होता त्यामुळे तिला चांगल्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
फोटोमध्ये तेजस्विनी एका स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री स्विमिंगचा पुरेपूर आनंद घेत आहे. यावेळी तिने आपल्या कानात एक फुल देखील अडकवले आहे जे लक्षवेधी ठरत आहे. ‘तुमच्यातील शांतात जपा’ या कॅप्शनखाली तेजस्विनीने हा फोटो पोस्ट केला आहे.
आपल्या अभिनयासोबत तेजस्विनी स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी तिने ग्रुपिझम आणि घराणेशाही बाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होत. अथांग आणि रानबाजार या तेजस्विनीच्या सिरीज प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या होत्या. सध्या ती पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
तेजस्विनीच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला नावे देखील ठेवली आहेत. स्विमिंग चांगला व्यायाम आहे अशी एकाने कमेंट केली आहे. तर आणखी एकाने ‘पाणी मै आग लगा दि’ असं म्हंटल आहे. काहींनी तर तेजस्विनीच्या या फोटोवर ‘बिकीनीतील फोटोची वाट पाहतोय’ असं म्हणत तेजस्विनीला ट्रोल केलं आहे.