बॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनासने सोशल मीडियावर तिचा एक नवीन लूकचा फोटो शेअर केले आहे. यात ती कॅज्युअल वेअरमध्ये दिसत आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने स्वत:ला “ब्लू जीन बेबी’ असे संबोधले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत प्रियांका पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. यात अभिनेत्रीने पावडर ग्रे बूट्स आणि बेसिक मेकअपद्वारे लूक पूर्ण केला आहे.
हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले की, “ब्लू जीन बेबी.’ सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या या लूकवर चाहते फिदा झाले असून यावर असंख्य कमेंट्स येत आहे. तसेच बॉलीवूडमधील कलाकारांनीही तिच्या या लूकची स्तुती केली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास प्रियांकाने आपल्या आगामी “टेक्स्ट फॉर यू’ हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
या चित्रपटाची कथा जिम स्ट्रॉज यांनी लिहिलेले असून तेच दिग्दर्शन करणार आहेत. हा जर्मन भाषेतील “एसएमएस फर डीच’ य चित्रपटाचा इंग्रजी रिमेक आहे. याची कथा सोफी क्रॅमर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात प्रियांकासोबत सॅम ह्यूगन मुख्य भूमिका साकारत आहे.