भारतीय-अमेरिकन अभिनेता रवी पटेलच्या मते, आता हॉलीवूडमध्ये आपल्या देशातील प्रतिभावंत कलाकारांसाठी बरेच काही चांगले बदल झाले आहे. तो म्हणाला, भारतीय कलाकार पश्चिमेकडील राष्ट्रांमध्ये प्रसिद्धी मिळवत आहेत. पटेलला त्याच्या आत्मचरित्रात्मक कॉमिक डॉक्युमेंटरी “मीट द पटेल्स’ या नावाने ओळखले जाते. तो लवकरच गॅल गाडोट स्टार अभिनीत “वंडर वूमन 1984′ मध्ये दिसणार आहेत. रवी म्हणाला, मी सहमत असून हे वास्तव आहे. मला वाटते की, त्या दृष्टीने मी खूपच भाग्यवान आहे.
माझे करिअर जसजसे पुढे गेले तसतसे भारतीयांनीही अमेरिकेशी आपली नाळ जोडली आहे. माझी वाटचाल सुरू असताना हॉलीवूडमध्ये भारतीयांसाठी चांगल्या भूमिका मिळत आहेत. याबद्दल मी कृतज्ञ आहे. रवीला रुढीवादीपणा टाळणे सोपे होते. तो म्हणाला, मी माझ्या आवडीनुसारच भूमिका साकारत असल्याने ते सोपे ठरले आणि मला एखादी गोष्ट अनुचित वाटली तर मी बोलतो.
तसेच पाश्चात्य देशातील आशियाईचे प्रतिनिधीत्व कसे बदलले याबाबत विचारले असता तो म्हणाला, “या देशातील बहुतेक कंपन्यांमध्ये भारतीय नागरिक उच्च पदावर आहेत. आम्ही अमेरिकेत पुनरागमन करीत आहोत. आम्ही देशात अभिजात आणि शक्ती दोन्ही मिळवू शकतो. अलीकडील निवडणूक हे एक उत्तम उदाहरण होते आणि ही केवळ एक सुरुवात असल्याचे त्याने सांगितले.