मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली आणि त्यानंतर लेझर ट्रिटमेंटद्वारे त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला होता. त्यामुळे त्यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करत त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यानुसार, त्यांच्या डोळ्यावर आज सकाळी 9 वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली.
ठाणे शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.