ओतूर- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सर्वत्र संचारबदी करण्यात आली असताना अजुनही काही नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. आळेफाटा पोलिसाांच्या वतीने यावर आळा घालण्याता प्रयत्न सुरु आहे.
पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आलेली आहे. प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे..दुध,गॕस,भाजी पाला व जीवनावश्यक सामग्री वाहतुक सोडून कुठलेही वाहन येण्यास नाक्यावर बंदी करण्यात आली आहे. तर आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणीही विनाकारण फिरु नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसल्यास या अतिउत्साही नागरिकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार, ताकीद पोलिस निरिक्षक टी.वाय.मुजावर यांनी स्थानिकांना दिली आहे.