26/11: तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येणार की नाही?

अमेरिकी न्यायालयात होणार सुनावणी

वॉशिंग्टन – पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन व्यावसायिक तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येणार की नाही याचा फैसला पुढील वर्षी फेब्रुवारीत होईल. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांच्या (26/11) कटात सामील असलेल्या राणा याला भारताने फरार म्हणून घोषित केले आहे.

भारताकडून राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती अमेरिकेला करण्यात आली. त्यानंतर चालू वर्षी जूनमध्ये अमेरिकेत त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आता त्याच्या प्रत्यार्पणाविषयीच्या सुनावणीसाठी अमेरिकेतील न्यायालयाने पुढील वर्षातील तारीख (12 फेब्रुवारी) निश्‍चित केली आहे.

प्रत्यार्पणाला विरोध दर्शवणारी याचिका सादर करण्यासाठी राणाला 21 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर अमेरिका सरकारला उत्तर सादर करण्यासाठी आणखी महिन्याचा अवधी मिळेल. अमेरिकेने याआधीच राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अनुकूलता दर्शवली आहे.

राणा हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आणि पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक डेव्हिड कोलमन उर्फ दाऊद गिलानी याचा लहानपणीचा मित्र आहे. 26/11 च्या कटात सामील असणाऱ्या हेडली याला 2009 मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ राणा यालाही अटक करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.