पुणे – राज्य सीईटी सेलअंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 12 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्जासाठी दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. विद्यार्थ्यांना दि. 7 व 8 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सीईटीसाठी अर्ज केले होते. मात्र, काही विद्यार्थ्यांना शुल्क भरता आले नाही. काही विद्यार्थी वेळेत अर्ज करू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सीईटी सेलमार्फत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
तीन व पाच वर्षीय विधी, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, बीए-बीएड, बीएस्सी-बीएड, बीएड-एमएड या उच्च शिक्षणाच्या, तर तंत्र शिक्षणाच्या एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, एमसीए, मॉस्टर ऑफ ऑर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. ही विद्यार्थ्यांची शेवटची संधी राहील. यात परीक्षा केंद्र बदलाची कोणतीही सुविधा नाही. एकदा अर्ज सादर केलेल्या अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.