नवी दिल्ली – मणिपूर पोलिसांनी चुराचंदपूर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. हओलेजंग गावाच्या बाहेरील भागात सुरक्षा दलांनी चार बंदुक, एक मोर्टार आणि दारूगोळा जप्त केला. त्यांच्याकडून भारतीय रुपयांच्या बनावट नोटाही सापडल्याचे समजते.
अन्य एका छाप्यात इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील किस्पांत जंक्शन येथून तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन एसएलआर रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आसाममध्ये शस्त्रास्त्रांसह तिघांना अटक
आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यात तीन जणांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई सुरू केली, ज्या अंतर्गत आरोपींना अटक करण्यात आली.
चौकशीनंतर आरोपींनी शस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांना नेले. ही शस्त्रं प्लास्टिकच्या पाकिटात गुंडाळून ठेवली होतीत्यामध्ये एके सीरिजच्या रायफल आणि मॅगझिनचाही समावेश होता. याशिवाय तीन पिस्तूल, तीन जिवंत ग्रेनेड आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेतया प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.