भोसरी : केंद्रीय अर्थसंकल्प हा बचतीपेक्षा खर्चाला प्रोत्साहन देणारा असून अर्थव्यवस्थेतील बदलांच्या अनुषंगाने करप्रणालीत बदल घडून येणे अपेक्षित असते. त्यानुसार चालू अर्थसंकल्पात आयकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन सनदी लेखापाल चेतन डागा यांनी केले.
भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल ऑफ़ इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टंड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “केंद्रीय अर्थसंकल्प’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डागा बोलत होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी केले. डॉ. मानसी कुर्त्कोती, सनदी लेखापाल संतोष संचेती, डॉ. मनोहर सानप, एम.यू .मुलाणी प्रा. हेमकांत गावडे, डॉ. नम्रता तळपे, डॉ. ललितकुमार धोका, प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी अर्थसंकल्पा संदर्भातील विविध बाबींवर मार्गदर्शन केले. चर्चासत्राज संतोष संचेती, प्रा. डॉ. रश्मी ढोबळे, प्रा. डॉ. शेखर पाटील, प्रा. दीपक पवाडे, प्रा. तुकाराम आघव, प्रा. सुनिल पवार, प्रा. अंकुश काळे यांच्याबरोबरच प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.